Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजKerala Landslide : वायनाडमध्ये आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Kerala Landslide : वायनाडमध्ये आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वायनाड | Wayanad

केरळ (Kerala) येथे वायनाडमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. भूस्खलन (Wayanad Landslide) झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून त्याची माहिती केरळ आरोग्य विभागाने (Kerala Health Department) दिली आहे.

- Advertisement -

शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पथकाकडून शोध आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील आहे.

हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं.

वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदतकार्य सुरु आहे. पावसामुळे आणि रात्री अंधारामुळे मदतकार्यात अडथळा येत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा सकाळी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या