Sunday, November 24, 2024
HomeUncategorizedखामगाव (घाटपुरी) : जगदंबा देवी मंदिरात भक्तांची गर्दी

खामगाव (घाटपुरी) : जगदंबा देवी मंदिरात भक्तांची गर्दी

दिपक सुरोसे

शेगाव – Shegaon

- Advertisement -

महाराष्ट्रातील (maharastra) लाखो भाविकांची अगाध श्रध्दा असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील घाटपुरी येथील श्री जगदंबा संस्थानमध्ये देवीच्या दर्शनासाठी येणार भक्तांची संख्या दररोज वाढत आहे. पहाटे ५ वाजतापासूनच देवीचे भक्त मंदिराची वाट धरतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत या मंदिरा भक्तांची गर्दी दिसून येते.

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून हे मंदिर नवरात्रीच्या नऊ दिवस २४ तास उघडे ठेवण्यात आले आहे यंदा अष्टमीचा होम सोमवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

घरबसल्या ऑनलाईन देवीचे दर्शन : घाटपुरीच्या जगदंबा देवीचे भक्तांना घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेता येत आहे. यासाठी संस्थानतर्फे फेसबुक आणि यु ट्युबवर लाईव्ह प्रसारण सुरु करण्यात आले आहे.

या मंदिरातील देवीची मुर्ती काळ्या पाषाणाची आहे. जागृत देवी असल्याची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती आहे. या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवस बोलणाऱ्या भक्तांची मनोकामना पुर्ण होते अशी अख्यायिका आहे. यंदा या ठिकाणी २६ सप्टेंबर २०२२ पासून यात्रा भरली आहे.

जानराव देशमुख यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरु असताना ३ फुटाची मुर्ती आढळून आली. त्यांनी मुर्तीची स्थापना मंदिरात केली त्यावेळी हा परिसर आडवळणाचा होता. दोन्ही बाजुने नदी वाहात होती. हळूहळू देवीचा महिमा राज्यभरात पोहोचला. त्यामुळे अनेकजण येथे दर्शनासाठ यायचे व नवस बोलायचे. तो नवस पुर्ण झाल्यावर नवस फेडायला यायचे व आजही येत आहेत. या देवीच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे.

नवरात्रोत्सवाबरोबर वर्षभर भक्त येथे दर्शनासाठी येत आहेत. दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. सध्या या मंदिरा स्वरुप विशाल आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरातील देवीच्या अंगावर सोन्या-चांदीचे आभुषण आहेत. मंदिर परिसरात खेळणी, प्रसाद, ओटी, हार, फुले याचबरोबर खवैय्यांसाठी हॉटेल्स लावण्यात आली आहेत. येथील शिवाजी नगर पोलिसांच बंदोबस्त मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेपण लावण्यात आले आहेत.

अखंड ज्योतीचे ५०० दिवे

मनोकामना पुर्ण होण्यासाठी अनेकजण घाटपुरीच्या देवीच्या मंदिरात नवरात्राच्या नऊ दिवस अखंड ज्योतीचे दिवे लावतात. भक्तांच्या मागणीनुसार मंदिरात गत १५ ते २० वर्षापासून नवरात्राच्या काळात अखंड ज्योतीचे दिवे लावण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. यंदा ५०० च्यावर दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे नवरात्रात अखंड जळत राहणार आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी संस्थानच्या वतीने दोन कर्मचारी तेथे तैनात ठेवण्या आले आहेत. हे दिवे या मंदिरात येणाऱ्या भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या