Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी 'या' नेत्याची निवड 

Maharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड 

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल शनिवारी जाहीर झाले.या निवडणुकीत महायुतीला २३६ तर मविआला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये महायुतीमधील भाजपला १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर मविआतील काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-व इतरांना १२ जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी

यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून नुकतीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईत (Mumbai) अजित पवारांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार (MLA) उपस्थित होते. त्यानंतर या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जुलै २०२६ – दडपशाहीने प्रश्न कसे सुटतील?

0
लोकशाहीत लोकभावना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या प्रश्नांकडे डोळेझाक करून चालत नाही, हा इतिहास आहे. नीट पेपर फुटीप्रकरणामुळे आज देशभरातील लाखो तरुण आणि त्यांचे पालक...