Saturday, May 17, 2025
Homeनगरदिवसा घर फोडून साडे चार तोळे लांबविले

दिवसा घर फोडून साडे चार तोळे लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील खारेकर्जुने (Khare Karjune) येथील घर फोडून (Burglary) एक लाख 36 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. बुधवारी (दि. 8) सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

जायकवाडीचा ‘समन्यायी’ लढा सर्वोच्च न्यायालयात

कल्पना सतिष निमसे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी शोकेसचे ड्राव्हर मधून सोन्याचे कानातील वेल, दोन गंठण, मंगळसूत्रातील वाट्या, कर्णफुले असे एक लाख 36 हजार 500 रूपये किमतीचे सुमारे साडे चार तोळ्याचे दागिने (Gold Jewelry) चोरून नेले. दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा.निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.

दोन बुरखाधारी महिलेकडून ज्वेलर्समध्ये हातसफाई160 कोटी 28 लाखांचा पीक विमा अग्रीम जमा होणार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...