Friday, October 11, 2024
Homeनगरखरवंडी कासारमध्ये दोन ठिकाणी दरोडा

खरवंडी कासारमध्ये दोन ठिकाणी दरोडा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील खरवंडी कासार येथील वैद्यकीय व्यावसायीक तसेच एका शेतकर्‍याच्या घरावर अशा दोन ठिकाणी सोमवारी (दि.10) मध्यरात्री दरोडा टाकून दरोडेखोरांनी कुटुंबियांना मारहाण करत दोन्ही घरातून सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान खरवंडी कासार येथे आठ दिवसांत चारवषला चोरीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

- Advertisement -

खरवंडी येथील डॉ.संदीप घुले यांच्या घराच्या दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरामध्ये असणार्‍या डॉ.सजंय घुले व त्यांच्या पत्नी कविता घुले यांना मारहाण केली.चोरट्यांची संख्या जास्त असल्याने व डॉ.घुले यांनी प्रतीकार कमी केल्याने घुले कुटुंब वाचले. घरामधील हॉल व किचनमधील सर्व वस्तू व सामान असता-व्यस्त फेकून दिले. त्यांनी दरवाजा उघडताच प्रथम डॉ.घुले यांच्या हातावरती काठी मारल्याने डॉ.घुले हे जागेवर पडले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या हातावर काठी मारली त्या दोघांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तुमच्याकडेे काही आहे ते सर्व गुपचूप द्या नाहीतर जीवे मारू अशी धमकी यावेळी त्यांनी दिली.कपाटामधील सव्वा दोन तोळे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच डॉ. घुले यांच्या वडिलांच्या बोटामधील सात ग्रॅमची अंगठी चोरून नेली. यासह चोरट्यांनी दोन मोबाईल व चारचाकी गाडीची चावी त्यांच्या समवेत नेली.

यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा जगताप गल्ली येथे अशोकराव जगताप यांच्या घराकडे वळवला. याठिकाणी बंद घराचा दरवाजा तोडून घरामधील सामान, कपाटे तोडली असून काही मिळते का हे त्या ठिकाणी पाहिले. दरोड्याच्या प्रकाराची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पीएसआय श्रीकांत डांगे, पो.नि.सुहास बटुळे, भाऊसाहेब खेडकर, आसाराम बटुळे, संदीप बडे यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली चोरी झालेल्या सर्वांनी फिर्यादी व पंचनामा करून फिर्याद दाखल करण्यात आली यापुढील तपास श्रीकांत डांगे हे करत आहे. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आठ दिवसांमध्ये चार चोर्‍याचे प्रकार घडले असून यामध्ये मालेवाडी येथील रावसाहेब नारायण खेडकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 75 हजार रुपयांची चोरी झाली होती. मागील आठवड्यात खरवंडी कासारमधून अण्णासाहेब सोनवणे यांच्या घरासमोरून सायंकाळी नऊच्या सुमारास एका म्हशीची चोरी करून गाडीमध्ये नेत असताना त्या ठिकाणी त्या चोरट्यांना पकडण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या