Friday, May 16, 2025
Homeक्रीडाKhelo India Youth Games 2025 - नाशिकच्या मितालीला तलवारबाजीत रौप्य पदक

Khelo India Youth Games 2025 – नाशिकच्या मितालीला तलवारबाजीत रौप्य पदक

 

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘खेलो इंडिया युथ गेम्स 2025’ मध्ये नाशिकची तलवारबाजी खेळाडू मिताली परदेशीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून रौप्य पदक पटकावले. तलवारबाजीच्या ईपी या क्रीडा प्रकारात खेळताना मितालीने उप-उपांत्य लढत 45 -31 अशी जिंकली, तर उपांत्य लढत 45 – 39 अशी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम लढतीत तिने हरयाणाच्या दिपांशीला चांगलेच झुंजविले. परंतु शेवटच्या दीड मिनिटात मितालीला तीन गुण गमवावे लागले आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

खेळातील राष्ट्रीय रौप्य पदकाबरोबरच मितालीने नुकत्याच पार पडलेल्या 10 वी एस. एस. सी. परीक्षेत तब्बल 96 % मार्कस प्राप्त करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. ती निर्मला कॉन्व्हेन्ट स्कूलची विद्यार्थी आहे. या दुहेरी यशामुळे खेळ आणि अभ्यास या दोन्हींचा योग्य समन्वय साधल्यास दोन्हीही क्षेत्रात यश मिळवता येते याचे उदाहरण मितालीने घालवून दिले. मिताली गेल्या पाच वर्षापासून फेन्सिंग प्राशिक्षक प्रसाद परदेशी, राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशकात तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati महायुती सरकारकडून राज्यभरात भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, नाशिकमध्येही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचवटी...