Sunday, April 27, 2025
Homeनाशिक‘किऑस्क’ची बेशिस्त वाहनधारकांवर नजर; राजीव गांधी भवन येथे यंत्रणा कार्यान्वित

‘किऑस्क’ची बेशिस्त वाहनधारकांवर नजर; राजीव गांधी भवन येथे यंत्रणा कार्यान्वित

नाशिक । प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेसह बेशिस्त वाहनधारक आणि परिसरातील घटनांवर नजर ठेवणारी किऑक्स यंत्रणा शनिवार (दि.9) पासून राजीव गांधी भवन समोर कार्यन्वित करण्यात आली. खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. या यंत्रणेमुळे पोलीसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. शहरातील ही दुसरी किऑस्क यंत्रणा आहे.

- Advertisement -

राजीव गांधी भवनजवळ शनिवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल, सभागृहनेते सतिश सोनवणे, भाजप चे सभागृह गटनेते जगदीश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, कोडवेल किऑक्स कंपनीचे संस्थापक आनंद सुंदरराज आदी उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किऑक्स यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा शहरातील 13पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे.

9 सप्टेंबर 2019 पासून उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या ठिकाणच्या घटनांच्या दोषसिध्दतेसाठी या यंत्रणेतील हायटेक पुरावे कामी येणार आहेत. या यंत्रणेची वयोमर्यादा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. या मशिनच्या माध्यमातून पोलीस,रूग्णवाहिका तसेच अग्निशमन विभागाची तात्काळ मदत मिळविता येणार आहे. मशीनमध्ये पॅनिक बटण आणि कॅमेरा आहे. हे मशीन परिसरातील सर्व घटनांवर नजर ठेवणार आहे. मुलींसह महिलांनी मदतीसाठी मशीनचे पॅनिक बटन दाबताच त्याची सूचना पोलिसांसह संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. तसेच कॅमेर्‍यामुळे सिग्नलवरील सर्व चित्रिकरण होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करणे शक्य होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या