Sunday, May 18, 2025
Homeजळगावकिशोर पाटलांच्या विजयासाठी गुढे येथील तरूणांसह अबालवृध्दांनी बांधली मोट

किशोर पाटलांच्या विजयासाठी गुढे येथील तरूणांसह अबालवृध्दांनी बांधली मोट

पाचोरा । प्रतिनिधी pachora

- Advertisement -

पाचोरा-भडगाव विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार तथा आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत गुढे येथे रॅलीला सुरवात झाली. बस स्थानकापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संत सावता महाराज मंदिर, भवानी मंदिर, संत नरहरी चौक, संत सेना महाराज मंदिर आदि भागात ही रॅली काढण्यात आली.

रॅलीला गुढेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. तर तरूणासंह वृध्दांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत विजयाची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी.ए.पाटील, पथराडचे भाऊसाहेब पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, गुढ्याचे सुमित पाटील, राहूल पाटील, आबा फौजी, प्रविण पाटील, प्रकाश हीरे, भगवान पाटील, शिंदिचे योगेश पाटील, गुलाब पाटील, पाढंरथचे नारायण पाटील, भाऊसाहेब पाटील, वसंत पाटील, पिचर्डेचे संजय पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर पाटील यांचे स्वागत
दरम्यान काल वाडे (ता.भडगाव) येथे प्रचार रॅली काढण्यात आली. तेथे प्रत्येक घरी आमदार किशोर पाटील यांचे औक्षण करण्यात आले. महीलांनी श्रीफळ नारळ देऊन विजयाची खात्री दिली. यावेळी एक महीला म्हटली की, मुख्यमंत्र्यानी आम्हाला महिन्याला दिड हजार रूपये देण्याचा निर्णय घेऊन खर्‍याअर्थाने महीलांचा सन्मान केला आहे. त्यामुळे महीलाही मुख्यमंत्र्याचे पर्यायाने तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून तुमच्या पाठीशी राहतील, म्हणुन तुमचा विजय पक्का असल्याची मत मांडले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sansad Ratna Award : मोठी बातमी! संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; ‘या’...

0
नवी दिल्ली | New Delhi लोकसभा आणि राज्यसभा (Loksabha and Rajaysabha) सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवषी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार (Sansad Ratna...