Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनभाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या, 'किसी का भाई किसीकी जान' कसा वाटला? बॉक्सऑफिसवर किती...

भाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या, ‘किसी का भाई किसीकी जान’ कसा वाटला? बॉक्सऑफिसवर किती कमावणार?

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खानच्या (Salman Khan)’किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट आज म्हणजेच २१ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला.

- Advertisement -

चित्रपट रिलिज होण्याआधीच या चित्रपटाची अ‍ॅडव्हास बुकिंग फुल झाली होती असा दावा करण्यात येत होता. चित्रपट रिलीज होताच सलमानच्या चाहत्यांनी सगळीकडे थिएटर मध्ये गर्दी केली आणि जल्लोष सुरू केला आहे.

चित्रपट रिलीज झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रीया देण्यास सुरवात केली आहे. दरम्यान सकाळपासून चित्रपटाचे अनेक स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चाहते थिएटरमधूनच चित्रपटाची अपडेट्स देत आहेत. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ असल्याचे बघायला मिळत आहे.

दरम्यान सोशल मिडीयावर या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रीया ही बघायला मिळत असून काही चाहत्यांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर चित्रपटाच्या पूर्वार्धाची चर्चा आहे आणि बहुतेक नेटकरी या चित्रपटाचा इंटरव्हल खुपच खराब असल्याच सांगत आहे.

सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे. सिनेमात सलमान खान,व्यंकटेश दग्गुबाती,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुनावणी संपताच कोर्टात राडा; प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला, पोलीसांनी हल्लेखोराला पकडलं

0
कोल्हापूर | Kolhapurइतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न...