Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यारुपाली चाकणकरांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले ; म्हणाल्या, आपला आवाका आणि..

रुपाली चाकणकरांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले ; म्हणाल्या, आपला आवाका आणि..

मुंबई | Mumbai

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पुन्हा पक्षबांधणीसाठी शरद पवार महाराष्ट्र भर फिरणार आहेत. यासाठी त्यांनी सुरूवात नाशिकमधून केली. तर येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Rayat Kranti Sena Chief Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका (Offensive Remarks) केली होती. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना, आपला आवाका आणि कुवत बघून बोलण्याचा सल्ला सदाभाऊ खोत यांना दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीप्रमाणेच रयत क्रांती संघटना देखील सत्तेत सहभागी आहे.

- Advertisement -

क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांनी, पूर्वी बापाने पाप केले की ते मुलाला फेडावे लागत होते. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावे लागते. पवारांना आता हे पाप फेडावे लागणार आहेत. तर भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका केली होती.

मात्र, शरद पवार साहेबांच्याबद्दल अतिशय संतापजनक विधाने करणारे विधान परिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावे, असे रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

त्या असे ही बोलल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून चार कार्यकर्ते जमवता आले नाहीत, त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दल बोलायची गरज नाही, अशा शब्दांत चाकणकर यांनी खोत यांना फटकारले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या