Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याKolhapur By-Election Results : करुणा शर्मा-मुंडेंना किती मिळाली मतं?

Kolhapur By-Election Results : करुणा शर्मा-मुंडेंना किती मिळाली मतं?

कोल्हापूर | Kolhapur

काँग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या निवडणुकीत (Kolhapur North By-Election) काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने (BJP) सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. आज या पोटनिवडणुकीचे निकाल आज हाती आले आहेत.

- Advertisement -

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजपच्या सत्यजित कदम यांना पराभूत केलं. या निवडणुकीत जयश्री जाधव यांनी १८ हजार ९०१ मतांनी विजय मिळवत सत्यजित कदम यांचा पराभव केला. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार तसेच नगरसेवक असताना महापौर होण्याचा असा दुहेरी मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. (Kolhapur North By-Election Results)

मात्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. शिवशक्ती सेनेच्या (Shivshakti Sena) तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली. कोल्हापूरात त्या प्रचारदेखील करत होत्या. मिडिमामध्ये त्यांच्या बातम्या येत होत्या. करुणा शर्मा-मुंडे कोल्हापूरात कोणताही चमत्कार घडविणार नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती होते. तरीदेखील त्यांना किती मते मिळाली याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार करुणा शर्मा-मुंडेंना ११ फेऱ्यांमध्ये अवघे ६१ मते मिळाली आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या