Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रउदे ग अंबाबाई! अंबाबाई भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता थेट गाभाऱ्यातुन दर्शन घेता...

उदे ग अंबाबाई! अंबाबाई भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता थेट गाभाऱ्यातुन दर्शन घेता येणार

कोल्हापुर | Kolhapur

- Advertisement -

अंबाबाई देवीच्या (Kolhapur Mahalaxmi Devi Temple) भक्तांसाठी खुशखबर समोर येत आहे. कोरोनाच्या काळापासून भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुनच देवीचे दर्शन घेता येत होते. पण करवीर निवसनी अंबाबाई देवीचे दर्शन आता गाभाऱ्यातुन करता येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे.

आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या विरोधात दंड थोपटणार; या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवणार

काही गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे.तसेच देवीची ओटी देखील भरता येणार आहे. यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.

Chhagan Bhujbal : बीडमध्ये भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात. मंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात. एका पुणेकर भक्ताने अंबाबाईसाठी 5 किलो 832 ग्रामचे चांदीचे तोरण अर्पण केलं आहे. तोरणाची अंदाजी किंमत रू 4,94,188 रुपये इतकी आहे.त्यामुळे देवीची दर्शनी बाजू आणखी आकर्षक झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या