Tuesday, June 17, 2025
Homeनगरकोल्हार भगवतीपूर येथे एकाच रात्री 3 ठिकाणी घरफोडी

कोल्हार भगवतीपूर येथे एकाच रात्री 3 ठिकाणी घरफोडी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार भगवतीपूर येथे गावठाणाच्या मध्यवर्ती दाट लोकवस्तीमध्ये तीन ठिकाणी घरफोडी व एक ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये रकमेवर डल्ला मारला.

- Advertisement -

येथील संजय शामलाल आसावा यांच्या पारले एजन्सी दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथे एकूण 5 कुलुपे चोरट्यांनी तोडली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा दुसर्‍या दिशेला वळविला. एवढेच नाहीतर सीसीटीव्हीचे डीव्हीआर लंपास केले. त्यासोबत 15 हजार रुपयांची रोकडदेखील लांबविली. येथून जवळच असलेल्या चंद्रकांत शेलार यांच्या घरातील सर्व बाहेरगावी गेलेले होते.

बंद घर पाहून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाची उचकापाचक केली. घरी कोणीही नसल्याने येथून किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. या घराच्या जवळच सागर अनिल कदम यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. परंतु त्यादरम्यान आजूबाजूचे रहिवाशी जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. तसेच हनुमान मंदिरासमोरील सुनील बोर्‍हाडे यांच्या दुकानातून किरकोळ रक्कम व किराणा माल लंपास केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...