Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमकोल्हार खुर्द येथून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

कोल्हार खुर्द येथून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

दोघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे दोन तरुणांनी अज्ञात कारणासाठी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याची घटना 12 जून रोजी घडली. याबाबत दोघा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शिरसाठ (वय 34) हे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे परसराम रामदास थोरात, रुद्राक्ष राजेंद्र मोरे, पवन दिलीप डोईफोडे हे संदीप शिरसाठ यांच्या मुलाचे मित्र असून ते नेहमी एकत्रीत क्रिकेट खेळत असतात. 12 जून रोजी सायंकाळी 5 वाजे दरम्यान संदीप शिरसाठ यांचा मुलगा विघ्नेश हा क्रिकेट खेळण्यासाठी गावातील मारुती मंदिराकडे जातो, असे सांगून घरातून बाहेर गेला.

- Advertisement -

रात्री 8 वाजेपर्यंत तो घरी आला नाही. त्याचे नातेवाईक मारुती मंदिराकडे शोध घेत होते. त्याचवेळी साई प्रकाश कानडे याचे फोनवर विघ्नेश याच्या मित्रांनी फोन करुन सांगितले की, आम्ही क्रिकेट अकॅडमी लावण्यासाठी जाणार आहे. त्या बाबतची चिठ्ठी आम्ही मारुती मंदिराचे जवळ ठेवलेली आहे. संदीप शिरसाठ यांनी त्या चिठ्ठीचा शोध घेतला असता मंदिर परिसरात ठेवलेली चिठ्ठी मिळुन आली आहे. संदीप शिरसाठ यांचा मुलगा विघ्नेश शिरसाठ व परसराम थोरात या दोघांचे अपहरण करण्यात आले. अशी खात्री झाल्यानंतर संदीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र त्रिंबक मोरे, पवन दिलीप डोईफोडे, दोघे रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी. यांच्यावर गु.र.नं. 697/2024 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : यंदा २०० पाणी टँकरचे नियोजन; जिल्हा प्रशासनाचा टंचाई...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्हा प्रशासनाने (District Administration) यंदाही पाणीपुरवठ्यासाठी टंचाई आराखडा जाहीर केला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला...