Wednesday, February 4, 2026
HomeनगरKopergoan Election : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची

Kopergoan Election : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची

कोपरगाव । तालुका प्रतिनिधी

नगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज कोपरगावमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोपरगावमधील एस. जी. विद्यालयातील मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, दुपारी ११:३० च्या सुमारास एस. जी. विद्यालयातील केंद्रावर दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आमनेसामने आले. उमेदवार प्रतिनिधी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दोन्ही गटांकडून करण्यात आला. ही शाब्दिक चकमक इतकी वाढली की, पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

YouTube video player

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून दूर हटवले. यावेळेस पोलिसांसोबतही काही प्रतिनिधींची शाब्दिक चकमक झाली. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर समर्थकांची गर्दी जमा झाली असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळी ११:३० पर्यंतची मतदानाची आकडेवारी

एकीकडे राजकीय तणाव असला तरी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी ७:३० ते ११:३० या पहिल्या चार तासांच्या कालावधीत कोपरगावमध्ये एकूण १८.६२ टक्के मतदान पूर्ण झाले आहे.

  • एकूण मतदार संख्या: ६३,४४८ (३१,१३२ पुरुष, ३२,३१२ महिला आणि ४ इतर)
  • एकूण झालेले मतदान: ११,८१७
  • पुरुष मतदार: ६,८३३
  • महिला मतदार: ४,९८४

जिल्ह्यातील इतर ठिकाणची स्थिती

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, कोपरगावसह देवळाली प्रवरा, पाथर्डी आणि नेवासा नगरपंचायतीसाठीही आज मतदान होत आहे. तसेच जिल्ह्यातील सात नगरपालिकांमधील १२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. आजच्या या मतदानानंतर उद्या, रविवारी (२१ डिसेंबर) या सर्व १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होतील. प्रशासनाने शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...