कोपरगाव । प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र कोपरगावच्या राजकीय क्षितिजावर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली आ. आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अखेर कोसळली असून शहरात परिवर्तनाचे वारे वाहिले आहेत. गेल्या चार वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकलेली आणि प्रलंबित राहिलेली नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून जनतेने कोल्हे गटाच्या ‘व्हिजन’ला कौल दिला आहे. या चुरशीच्या लढतीत भाजपा-कोल्हे गटाचे पराग शिवाजी संधान यांनी नगराध्यक्षपदाच्या गादीवर आपली मोहोर उमटवली असून, राष्ट्रवादी पुरस्कृत काका कोयटे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
नगराध्यक्षपदाची ही निवडणूक ऐतिहासिक आणि अत्यंत अटीतटीची ठरली.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. अखेरच्या फेरीअखेर भाजपाचे पराग संधान यांना 18,503 मते मिळाली, तर त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ओमप्रकाश (काका) कोयटे यांना 18,094 मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या 409 मतांच्या निसटत्या फरकाने पराग संधान यांनी ही विजयश्री खेचून आणली आहे. इतर उमेदवारांमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) राजेंद्र मुरलीधर झावरे यांना 3,496 मते, तर सपना भरत मोरे यांना 2,176 मते मिळाली आहेत.
केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या जागांवरही कोल्हे गटाने दणदणीत यश मिळवले आहे. एकूण 15 प्रभागांमधील 30 जागांपैकी तब्बल 19 नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपा आणि कोल्हे गटाच्या झेंड्याखाली विजयी झाले आहेत. यामुळे नगरपरिषदेच्या सभागृहात भाजपाचे निर्विवाद बहुमत सिद्ध झाले असून, आगामी पाच वर्षांसाठी कोपरगावच्या विकासाची सूत्रे आता विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील टीमकडे गेली आहेत.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार ः पराग शिवाजी संधान – 18503 विजयी (भाजपा), ओमप्रकाश दादाप्पा कोयटे – 18094, राजेंद्र मुरलीधर झावरे – 3496, सपना भरत मोरे 2176, विजय सूर्यभान वहाडणे – 591, नोटा – 386
सदस्य पदाचे उमेदवार –
प्रभाग क्र. 1 अ ः सोनाली संदीप कपिले – 1537 विजयी (राष्ट्रवादी), स्नेहा जनार्दन गायकवाड – 1336, दीपा वैभव गिरमे – 884, नोटा- 33 प्रभाग 1 ब – वैभव सुधाकर आढाव – 1219 विजयी (भाजपा), दादा रखमाजी आवारे – 129, सचिन शरदराव गवारे -1195, नोटा – 43 प्रभाग 2 अ – राहुल चंद्रहास शिरसाठ – 1471 विजयी (राष्ट्रवादी), राहुल उत्तम खरात – 1353, संदीप तुकाराम निरभवणे – 86, योगेश छबुलाल पवार – 358, नोटा – 80. प्रभाग 2 ब ः स्मिता शैलेश साबळे – 1441 विजयी (राष्ट्रवादी), स्वाती दीपक जपे – 1203, न्याजोबी सरदारखों पठाण – 42, संगीता श्रीनिवास पवार – 195, फमिदा हसम शेख – 315, नोटा- 52 प्रभाग 3 अ ः निर्मला सोमनाथ आढाव – 1535 विजयी (राष्ट्रवादी), पल्लवी गुरमीत सिंग डडियाल – 1423, नोटा – 50. प्रभाग 3 ब – जनार्दन सुधाकर कदम – 2052 विजयी (राष्ट्रवादी), आदित्य रवींद्र गरुड -105, मयूर विजय गायकवाड – 792, सुधाकर बाबुराव नरोडे – 33, नोटा – 26.ं प्रभाग 4 अ ः संजना संजय उदावंत – 1330 विजयी (भाजपा), रंजना रमेश गवळी – 1302, मंदा पिराजी साळुंखे – 166, नोटा – 38. प्रभाग 4 ब ः आकाश बबनराव वाजे – 1565 विजयी (भाजपा मित्र पक्ष), हनुमंत पांडुरंग नरोडे – 877, भरत आसाराम मोरे 214, सुनील आसाराम साळुंखे – 152, नोटा – 28. प्रभाग 5 अ ः संतोष माधव शिंदे – 1404 विजयी (भाजपा), अमित चंद्रकांत आगलावे – 866, नोटा – 98. प्रभाग 5 ब – वैशाली विजय वाजे – 1371 विजयी (भाजपा), अर्चना विनोद गलांडे – 337, शोभा अशोक घायतडकर – 550, प्रियंका किरण थोरात – 64, नोटा – 46. प्रभाग 6 अ ः पद्मावती योगेश बागुल – 1920 विजयी (भाजपा मित्र पक्ष), सुनिता सुनील खैरनार – 218, सारिका सुनील फंड 1061, नोटा – 62. प्रभाग 6 ब ः विक्रमाआदित्य संजय सातभाई – 1294 विजयी (भाजपा मित्रपक्ष), संदीप रामदास डुबरे – 138, मुकुंद रामेश्वर भुतडा – 1237, सलीम बनेमिया शेख – 419, संदीप मोतीराम शेवाळे 137, नोटा – 36. प्रभाग 7 अ ः प्रसाद बाळासाहेब आढाव – 1466 विजयी (भाजपा), प्रतिभा सुनील शिलेदार – 1225, प्रसाद दिलीप सारंगधर – 477, नोटा – 40. प्रभाग 7 ब ः गौरी मंदार पहाडे – 1985 विजयी (राष्ट्रवादी), सोनल अमोल अजमेरे – 1056, मोनिका प्रशांत कोपरे – 42, काजल विशाल खरात – 93, नोटा- 32. प्रभाग 8 अ ः मनीषा दत्तात्रय पगारे – 1358 विजयी (भाजपा), अनिता सुरेश चंदनशिव – 38, अर्चना सुखदेव जाधव – 61, सुनंदा माधव त्रिभुवन – 62 , विमल भगवान मरसाळे – 1230, वर्षा प्रफुल शिंगाडे – 288, वैशाली शुभम शिंदे – 80, नोटा – 32. प्रभाग 8 ब ः इम्तियाज रफिक अत्तार – 1505 विजयी (राष्ट्रवादी), किशोर बाबुराव काळे – 359, आरिफ करीम कुरेशी – 1102, हैदर हमीद पठाण – 61, अर्जुन रघुनाथ मोरे – 89, नोटा – 31. प्रभाग 9 अ ः जितेंद्र चंद्रकांत रणशुर – 1091 विजयी (भाजपा), सागर निंबा आहेर – 824, सिद्धेश शरद खरात – 146, राजेंद्र जयदेव खंडीझोड – 38, मधुकर विश्राम पवार – 263, नोटा – 50. प्रभाग 9 ब ः विजया संदीप देवकर – 1089 विजयी (भाजपा), लक्ष्मीबाई माधव आढाव – 146, भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे – 264, अंजना गंगाधर फडे – 682, बिना विजय भगत – 91, शमा आयुब शेख – 117, नोटा – 23. प्रभाग 10 अ – रवींद्र दत्तात्रय कथले – 1584 विजयी (भाजपा मित्र पक्ष), तुषार दादासाहेब गलांडे – 1107, नोटा- 39. प्रभाग 10 ब ः माधवी राजेंद्र वाघचौरे – 1389 विजयी (राष्ट्रवादी), वृषाली गणेश आढाव – 1112, श्रेया श्रीपाद भसाळे – 174, नोटा – 55. प्रभाग 11 अ ः सोनम अरुण त्रिभुवन – 996 विजयी (राष्ट्रवादी), स्वाती संतोष आरणे – 142, अंजना संजीव कांबळे – 341, संगीता गुलाब भालेराव 238, उषा सोमनाथ मस्के – 816, नोटा – 62. प्रभाग 11 ब ः प्रशांत बाळासाहेब कडू – 792 विजयी (भाजपा), योगेश वसंत उशीर – 442, शुभम कैलास काळे – 655, सय्यद शरफुद्दीन शमशुद्दीन – 338, राजेंद्र श्रावण लोखंडे – 42, योगेश छबुराव शिंदे – 265, नोटा – 30. प्रभाग 12 अ ः सविता कैलास मंजुळ – 1290 विजयी (भाजपा), विजया मीनानाथ आंग्रे – 1142, जयश्री कैलास चव्हाण – 271, भारती शामकांत शिंपी – 49, सुमैया इरफान शेख – 319, नोटा – 27. प्रभाग 12 ब ः हाजी मेहमुद मनवरभाई सय्यद – 1176 विजयी (राष्ट्रवादी), अक्षय गणेश जाधव – 410, योगेश बन्सीलाल मोरे – 319, सनी रमेश वाघ – 1151, नोटा – 42. प्रभाग 13 अ ः स्वप्निल दिलीप मंजुळ – 1234 विजयी (भाजपा), शिवाजी आनंदा खांडेकर – 1040 , जफर शफी पिंजारी – 536, आकाश भास्कर पंडोरे – 267, नोटा – 35. प्रभाग 13 ब ः नीलोफर फिरोज खान पठाण – 1494 विजयी (भाजपा), जुलेखा मेहबूब पठाण – 55, प्रतिभा सुरेंद्र बेलदार – 513, शेख हिनाकौसर मुक्तार – 965, नोटा – 82. प्रभाग 14 अ ः वाल्मीक जयसिंग लहिरे – 1156 विजयी (घड्याळ), शंकर वसंतराव गंगुले – 112, अविनाश कैलास पाठक – 943, इकबाल गनी बागवान – 299, नोटा – 33. प्रभाग 14 ब ः विद्या राजेंद्र सोनवणे – 1185 विजयी (भाजपा), यास्मिन गनी बागवान – 281, परीगाबाई सुनील राठोड – 152, सविता अशोक लांडगे – 47, माधुरी मच्छिंद्र शिंदे – 847, नोटा – 31. प्रभाग 15 अ ः सुरेखा विनोद राक्षे – 1625 विजयी (भाजपा), स्वप्नाली वैभव कानडे – 1102, वंदना लक्ष्मण साबळे – 204, नोटा – 52. प्रभाग 15 ब ः अनिल विनायक आव्हाड – 1540 विजयी (भाजपा मित्र पक्ष), वैभव बाबासाहेब चव्हाण – 138, विनोद साहेबराव नाईकवाडे – 898, साहिल रामचंद्र लकारे 14, गगन अनिल हाडा – 374, नोटा – 28.
हा निकाल आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोपरगाव मतदारसंघात आपली पकड मजबूत असल्याचा काळेंचा दावा या निकालाने खोडून काढला आहे. व्हिजन 2047 च्या नावाखाली कोपरगावला राज्यात एक नंबर बनवण्याचे आश्वासन देणार्या आशुतोष काळे आणि काका कोयटे या जोडीला शहरात मतदारांनी नाकारले असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. स्थानिक मतदारांनी स्नेहलता कोल्हे यांच्या ‘लढणार्या आणि भिडणार्या’ नेतृत्वावर आणि विवेक कोल्हे यांच्या युवा ऊर्जेवर विश्वास दाखवला आहे.
विजयाचा जल्लोष आणि गुलालाची उधळण!
निकालाचे चित्र स्पष्ट होताच कोपरगाव शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘विवेक कोल्हे आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि सर्व विजयी उमेदवारांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या विजयाने भाजपाच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. कोपरगावच्या विकासासाठी आता नवीन पर्व सुरू झाल्याची भावना नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
राजकारणात कोणी कोणाला संपवू शकत नाही, हे कोपरगावच्या जनतेने दाखवून दिले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव ज्या 409 मतांच्या फरकाने झाला होता, अगदी त्याच फरकाने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवून विवेक कोल्हे यांनी ‘आईच्या’ पराभवाचा बदला घेतला आहे. विरोधकांनी आखलेले चक्रव्यूह भेदून विवेक कोल्हे हा ढाण्या वाघ सार्या विरोधकांना पुरून उरला असून, साखरेच्या मग्रुरीचा सुपडा साफ झाला आहे.





