Tuesday, January 6, 2026
HomeनगरKopergoan News : काळजाचा थरकाप! शेतात रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Kopergoan News : काळजाचा थरकाप! शेतात रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोपरगाव । प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा खिळडी गणेश शिवार परिसरात शेतीकामात व्यग्र असलेल्या एका शेतकऱ्याचा रोटावेटर यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आज (५ जानेवारी २०२६) रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बाळनाथ साहेबराव रोहम (वय अंदाजे ६० वर्ष, रा. खेडीगाणे शिवार) असे मृत झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बाळनाथ रोहम हे सोमवारी दुपारी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारण्याचे काम करत होते. मशागत सुरू असताना रोटावेटरमध्ये काही कचरा अडकला. हा कचरा काढून यंत्र पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी रोहम हे रोटावेटरजवळ गेले होते. मात्र, कचरा काढत असताना अचानक त्यांचा हात फिरत्या यंत्रात अडकला. रोटावेटरचा वेग जास्त असल्याने काही क्षणातच ते संपूर्ण यंत्राच्या विळख्यात सापडले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

YouTube video player

ही घटना घडताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रोहम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रोटावेटरमध्ये अडकलेला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह यंत्रातून बाहेर काढण्यात आला.

सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळनाथ रोहम हे मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यांच्या निधनाने संपूर्ण कोपरगाव तालुक्यात आणि खेडीगाणे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतीकामासाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे हाताळताना थोडासा निष्काळजीपणा किती जीवावर बेतू शकतो, या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...