Wednesday, January 7, 2026
HomeनगरKopargaon : शेळ्या हाकलण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Kopargaon : शेळ्या हाकलण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव (Godhegav) येथे शेततळ्यावर चरायला गेलेल्या शेळ्या-मेंढ्या शेततळ्यावरुन हाकलत असताना मनिषा समाधान बीडकर (वय 23) या महिलेचा पाय घसरला आणि तळ्यातील पाण्यात पडल्याने तिचा बुडून मृत्यू (Farm Pond Woman Drowning Death) झाला. ही घटना गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, मनिषा समाधान बीडकर (वय 23) ही नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील बीडकर कुटुंबातील असून शेळ्या-मेंढ्यांना घेऊन कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील गोधेगाव शिवारात आली होती. गोधेगाव शिवारातील गट क्रमांक 123-2 मध्ये प्रभाकर चांगदेव भोकरे यांच्या शेतात गुरुवारी दुपारी मनिषा बीडकर एक वर्षाच्या मुलीसोबत मेंढ्या चारत होती. मेंढ्या शेततळ्याच्या आसपास होत्या. मेंढ्या शेततळ्यात पडू नयेत म्हणून त्या मेंढ्यांना (Sheep) हाकलत असतानाच मनिषाचा पाय घसरला व ती तळ्यात पडली.

YouTube video player

ही घटना बीडकर कुटुंबातील सदस्यांनी व काही शेतकर्‍यांनी पाहिली. त्यानंतर कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दल व कोल्हे कारखान्याच्या सेफ्टी टीमशी संपर्क करण्यात आला. पालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमोद सिनगर, प्रशांत शिंदे, सूरज काजळे व कारखान्याच्या टीमने ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात उतरून दोरीच्या साहाय्याने मनिषा समाधान बीडकर यांचा मृतदेह (Dead Body) शोधून बाहेर काढला. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...