Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगावात 13 करोना रुग्णांची वाढ

कोपरगावात 13 करोना रुग्णांची वाढ

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 1 डिसेंबर रोजी सापडलेल्या 13 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 142 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

- Advertisement -

त्यात 9 तर खासगी लॅबमधील 4 असे 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 133 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 13 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत.त्यात शहरातील स्वामी समर्थ येथील 1, धान्य बाजार येथील 1,अन्नपूर्णा नगर येथील 4, कोपरगाव येथील 1, तर ग्रामीणमधील टाकळी येथील 1,धामोरी येथील 1, मळेगाव थडी येथील 3,कोळपेवाडी येथील 1 असे 13 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यात काल दि. 2 डिसेंबर पर्यंत एकूण दोन हजार 437 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 300 रुग्ण बरे झाले आहेत. तर कालपर्यंत एकूण 16 हजार 798 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 14.50 तर मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के आहे. तर 40 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या