Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगावात अवैध वाळू उपसा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगावात अवैध वाळू उपसा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील धामोरी येथे गोदावरी नदी पात्रात तालुका पोलिसांना धाड टाकली. त्याठिकाणी आरोपी शुभम विश्वनाथ गवारे रा. मंजूर, कैलास गाढे रा. चासनळी, एकनाथ माळी रा. मोर्विस, बबलू बाळासाहेब कापसे रा.कासारी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू चोरी करताना आढळून आले. पोलिसानी आरोपींकडून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, व दोन ब्रास वाळू असा 6 लाख रुपये किमतीचा मृद्देमाल जप्त केला असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे .

- Advertisement -

कोपरगाव तालुका पोलीसांनी धामोरी शिवारात गोदावरी नदीपात्रात.12 जून रोजी धाड टाकली असता आरोपी शुंभम गवारे व कैलास गाढे यांनी संगनमताने मोर्विस गावचे जवळील गोदावरी नदीपात्रातील एक ब्रास शासकीय वाळू विनापरवाना बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर मध्ये भरली. आरोपी एकनाथ माळी व बबलू कापसे यांनी बेकायदेशीरपणे गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर ट्रॉलीसह उतरून वाळूची चोरी करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी एकनाथ माळी हा गोदावरी नदी पात्र ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळून गेला व आरोपी बबलू कापसे हा गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉली सह पळून गेला. पो.कॉ. अंबादास वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींविरूध्द भारतीय दंड संहिता 379, 511 34 प्रमाणे गुन्हा केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. प्रदीप काशीद करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या