Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमकारागृहातून पळालेला आरोपी जेरबंद

कारागृहातून पळालेला आरोपी जेरबंद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी (Accused) योगेश पारधे हा 6 महिन्यापूर्वी कोपरगाव कारागृहातून (Kopargav Jail) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) त्याला शिताफीने जेरबंद केले. शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारधे, रा. राममंदीर जवळ, कोल्हार खुर्द, ता. राहुरी याच्यावर भादंवि कलम 302, 364, 143, 147, 149, 201 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (2) (5), 3(1) (10) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी कोपरगाव कारागृह (Kopargav Jail) येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. आरोपीला 2 जून 2024 रोजी आजारी असल्याने औषधोपचारकामी शासकिय दवाखान्यामध्ये नेत असताना तो वाहनावरुन उडी मारुन पळून गेला होता. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत असताना आरोपीच्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत असतांना हा आरोपी आळंदी, जि. पुणे येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने त्या ठिकाणी जावून आरोपीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा आळंदी परिसरामध्ये भाड्याने रुम घेवून राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पथकाने आळंदी परिसरामध्ये 2 दिवस थांबून व वेशांतर करुन आरोपी राहत असलेल्या ठिकाणची माहिती घेतली. पथक आरोपीच्या घराचे आजुबाजुस सापळा रचुन थांबले. पोलीस पथकास पाहुन आरोपी घराचे भिंतीवरुन उडी मारुन पळून जावू लागला. त्यास पथकाने पाठलाग करुन पकडले. योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारधे यास पुढील तपासकामी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तपास पथकातील पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित येमुल, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांचे पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या