Friday, April 25, 2025
Homeक्राईमसबजेलमधील आरोपी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पसार

सबजेलमधील आरोपी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पसार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैद असलेला खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे. यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.

पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पो.हे.कॉ. पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जेराव पारधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 260/24 भारतीय दंड विधान कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवले असून पथके रवाना करण्यात आली. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...