Tuesday, November 26, 2024
Homeनगरकोपरगाव तालुक्यातील सरपंच व ग्रामसेविकेस 11 लाखांचा दंड

कोपरगाव तालुक्यातील सरपंच व ग्रामसेविकेस 11 लाखांचा दंड

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील नाटेगाव येथे 90 ब्रास मुरूमाचे अनधिकृतपणे उत्खनन करून त्याची वाहतूक केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेविकेला तहसीलदार संदीप भोसले यांनी 11 लाख 44 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाटेगाव येथे गारदा नदीलगत अनधिकृतपणे 90 ब्रास मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली असल्याची तक्रार दि. 6 मे 2021 रोजी दिपक दादाहरी पोळ यांनी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोपरगावचे मंडळ अधिकारी यांनी नाटेगाव येथे जाऊन गारदा नदीलगत उत्खनन केलेल्या जागेची पाहाणी केली व पंचनामा करून तहसील कार्यालयास सादर केला.

- Advertisement -

या पंचनाम्यामध्ये तत्कालिन सरपंच विकास अशोक मोरे व ग्रामसेविका एस. डी. अवचिते यांनी 90 ब्रास मुरूम या गौणखनिजाचे अनधिकृतरित्या उत्खनन करून वाहतूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार सरपंच विकास अशोक मोरे, ग्रामसेविका अवचिते यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) (8) व त्यात महाराष्ट्र शासन अधिनियम क्र.27/2015 नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली होती. त्यानंतर खुलासा मागविण्यात आला.

ग्रामसेविकेने लेखी सादर केलेला खुलासा संयुक्तीक नसल्याने अमान्य करण्यात आला आहे. तहसीलदार भोसले यांनी 5 जुलै 2024 रोजी यावर निर्णय घेत तत्कालिन सरपंच विकास अशोक मोरे, ग्रामसेविक अवचिते यांना विना परवानगी व अनधिकृतरित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी 11 लाख 44 हजार 800 रुपयांचा दंड केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या