कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) मोठ्या पुलावर शनिवारी सायंकाळी 6 ते 6:30 च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात (Accident) घडला. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडल्याने वसिम चांद शेख (वय 24, रा. अकोला) या तरुणाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी (Injured) झाला आहे. पुलावर सुरू असलेल्या अर्धवट कामामुळे आणि एकेरी वाहतुकीमुळे हा निष्पाप बळी गेल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मोठ्या पुलावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. दरम्यान, डिस्कवर दुचाकीवरून दोन युवक जात असताना, मागून येणार्या कंटेनरने (Container) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला डिव्हायडर आणि कंटेनरच्यामध्ये दाबले. ही धडक इतकी भीषण होती की, वसिम शेख याचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बघ्यांची गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, वाहतूक शाखेचे दिगंबर शेलार व पोलीस कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर (Accident) संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कंटेनर आणि चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले




