जेऊर कुंभारी । वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, घारी आदी गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
त्यातच आता कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे पुन्हा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. आज (दि ६ ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील बापु गिरमे, सुरेश गिरमे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानाने हल्ला करून जागीच ठार केले आहे. ही घटनी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला; हॉटेलात ८ जणांना जिवंत जाळलं
मागील दोन वर्षापासुन जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्री शेतात पाणी देण्याचे काम सुरु असते, यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बिबटयाने अनेक जनावरांचा बळी घेतला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले आहे.