Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : कोठला व नवनागापूरात घरगुती गॅसचे अवैध रिफिलिंग

Crime News : कोठला व नवनागापूरात घरगुती गॅसचे अवैध रिफिलिंग

दोन ठिकाणी एलसीबीचे छापे || 66 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या घरगुती एलपीजी गॅसच्या अवैध रिफिलिंग व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून 66 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी (13 डिसेंबर) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले यांना माहिती मिळाली.

- Advertisement -

कोठला परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये रजा अकिल शेख (वय 20) हा घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा अवैध साठा करून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती होती. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या आदेशानुसार पंचांसह तात्काळ छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे रिकामे व भरलेले सिलिंडर, गॅस भरण्याचे मशीन, वजनकाटा, बॅटरी आदी 19 हजार 600 रूपये किमतीचे साहित्य आढळून आले. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना तसेच ज्वलनशील पदार्थाबाबत आवश्यक खबरदारी न घेता अत्यंत धोकादायक पध्दतीने हा व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अंमलदार सागर ससाणे यांच्या फिर्यादीवरून रजा शेख विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नवनागापूर परिसरातही अशाच स्वरूपाच्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी चार रिकामे घरगुती सिलिंडर, सहा भरलेले सिलिंडर, गॅस भरण्याचे मशीन, वजनकाटा, बॅटरी असा एकूण 46 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षद ज्ञानदेव भागवत (वय 21, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...