श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील खानापूर परिसरात शुक्रवारी 6 कोयताधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला.यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल अशी माहिती तालुका पोलिसांनी दिली. खानापूर परिसरातील वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहाजणांच्या कोयता गँगने दरोडा टाकत एका वृध्द महिलेला मारहाण करून व जवळपास 24 तोळे सोन्याचे दागिने व 60 हजार रूपयांची रक्कम लूटून नेली.
मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे यांच्या वस्तीवर दरोडा पडल्याने या बाबत पोलिसांनी यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल अशी माहिती तालुका पोलिसांनी दिली. आज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर हे आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देणार असल्याचे समजते. खानापूर परिसरात दरोडा पडल्याने ग्रामस्थामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील गुन्हेगारांना तालुका पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.