Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकृषी संजीवनी मोहिमेचा आज शुभारंभ

कृषी संजीवनी मोहिमेचा आज शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी

चालू वर्षात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी उद्या सोमवारपासून (21 जून ते 1 जुलै) या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राज्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ सोमवारी (दि.21) राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वडगाव सिन्नर(ता.सिन्नर)येथील शेतीनिष्ठ शेतकरी भागवत बलक यांच्या शेतावर होत आहे.

- Advertisement -

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

कृषी संजीवनी मोहिमेदरम्यान शेतकर्यांना रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, तंत्रज्ञान प्रसार, रिसोर्स बँकेतील शेतकर्यांची सहभाग, खरीपाच्या मुख्य पिकांसाठी किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना या विषयी गाव पातळीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

कृषी विभाग, कृषी विद्यापिठांचे शास्त्रज्ञ व रिसोर्स बँक शेतकरी यांचे समन्वयाने मोहिम कालावधी त गाव बैठका, शिवार भेटी, शेतीशाळांचे आयोजन, गावागावात कृषि विषयक राबविलेल्या नाविण्यपुर्ण उपक्रमांना भेटी या बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.

संपूर्ण मोहिम कालावधीत शेतकर्यांना विविध विषयांच्या घडीपत्रिका वाटप , युट्युब व्हिडीयो व वेबिनार या मीडियातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी कृषी संजीवनी मोहिमेदरम्यान गाव पातळीवर करण्यात येणार्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या