श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच निम्म्या तालुक्यातील लाभक्षेत्राला वरदान (Boon) असलेल्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन (Kukadi Left Canal Rotation) श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याला मिळण्याची वेळ आल्यावर कालवा अवघा 500 क्युसेस करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शेतीला पूर्णक्षमतेने पाणी मिळणार नसल्याने कुकडीच्या (Kukadi) पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील फळबागा (Orchards) आणि उभ्या पिकांना कुकडीच्या पाण्याची प्रतीक्षा (Waiting for the Kukadi Water) करण्याची वेळ आली आहे.
कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन (Kukadi Left Canal Rotation) एक महिन्यापासून सुरू होते. कर्जत (Karjat), करमाळा (Karmala) तालुक्यातील भरणे झाल्यावर श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाणी मिळण्याची प्रतीक्षा (Waiting for the crops to get water) असताना कालव्यातील पाणी कमी झाले आहे. अगोदर 1 हजार 400 क्युसेसने सुरू असलेले कालव्यातील पाणी (Water) अवघे 500 क्युसेसने सुरू आहे. यात सगळ्या वितरीकांना पाणी मिळणे अशक्य असल्याने शेतकर्यांना उभी पिके जळताना पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. राजकीय नेत्यांनी जलसंपदा मंत्री (Minister of Water Resources) यांच्याकडे पुन्हा पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी (Demand) केली आहे. श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील शेतकर्यांना कुकडीच्या (Kukadi) पाण्यासाठी कायमच अन्याय सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
येडगाव धरणात पाणी सोडा : शेलार
कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 31 जुलैपासून सुरू झाले आहे. करमाळा व कर्जत तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पाणी सुरू होते. त्यासाठी कालवा येडगाव धरणातून टप्प्याटप्प्याने 1 हजार 400 क्युसेसपर्यंत सुरू होता. येडगाव धरणातील पाणीसाठा 28 टक्के राहिला असून काल हा कालवा 1 हजार क्युसेस सुरू होता. तो आज अचानक 500 क्युसेस करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील सिंचन होऊ शकणार नाही. तालुक्यातील सिंचन होण्यासाठी धरणात किमान 1 टीएमसी पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी माणिकडोह मधून एक टिएमसी पाणी येडगाव धरणात सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्याक्ष घनश्याम शेलार यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांना भेटून केली.