Friday, May 3, 2024
Homeनगरकुकडीचे पाणी पेटले; राष्ट्रवादी नेत्याची हातात दगड घेऊन नगरचे नेते आणि कुकडीच्या...

कुकडीचे पाणी पेटले; राष्ट्रवादी नेत्याची हातात दगड घेऊन नगरचे नेते आणि कुकडीच्या अधिकार्‍यांना तंबी

जुन्नर | Junnar

कुकडीच्या पाण्यावरून जुन्नरमध्ये राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता दिसतेय. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी थेट माणिकडोह धरण क्षेत्रावर जाऊन नगरच्या नेत्यांना आणि कुकडी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना आपली आगळ्या वेगळ्या शैलीत तंबी दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आक्रमक लांडे यांनी हातात दगड घेऊन अधिकारी आणि सत्तेतील नेत्यांची डोके फोडण्याची भाषा वापरली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नगर व सोलापूर या 3 जिल्ह्यांना व 7 तालुक्यांसाठी महत्वाचा असलेल्या 5 धरणांचा समूह असलेल्या कुकडी प्रकल्पात फक्त 21 टक्के पाणीसाठा आहे. अशात हवामान खात्याने यंदा पाऊस उशीरा असल्याचं सांगूनही नगर जिल्ह्यातील काही मंत्री व राजकीय नेते दबाव वापरून पाणी पळवणार असल्याचं बोललं जात आहे. नुकतीच पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली आणि पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात आज जुन्नर तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन सुद्धा केले. मात्र, देवराम लांडे यांच्या या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या 5 धरणांपैकी पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्यातील व माणिकडोह धरणातील साडेतीन टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडून 22 मे 2023 पासून कुकडी डावा कालव्यात 30 दिवसांचे उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. मात्र, त्या आधीच कुकडीचे पाणी पेटले आहे.

येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तालुक्यासाठी उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यासाठी 9 मे ला पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता संभाजी माने, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अशोक घोडके आदी उपस्थित होते.

सर्वपक्षीय नेत्यांचा तहसीलवर मोर्चा

जुन्नर तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणी राखून ठेवत उर्वरित पाणी अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात सोडावे. पाणी प्रश्नाबाबत जुन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्याय केल्यास शासनाविरोधात भविष्यकाळात तीव्र आंदोलन झेडण्याचा इशारा जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी रविवार दिला.काल कुकडी प्रकल्पाच्या पाणी प्रश्नासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट होऊन जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. माणिकडोह धरणातून रविवारी रात्रीच्या सुमारास आवर्तन सुरू करण्यात येणार असल्याने भविष्यात जुन्नरवासियांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार असल्याने आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या