Tuesday, March 25, 2025
Homeनगरकुकडी प्रकल्पातील संपादित जमिनीचा मोबदला मिळणार

कुकडी प्रकल्पातील संपादित जमिनीचा मोबदला मिळणार

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कुकडी प्रकल्पासाठी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा मोबदला अद्याप शेतकर्‍यांना मिळालेला नव्हता. आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे 54 गावांच्या भू-संपादन मोबदल्यासाठी प्रयत्न केले.

सध्या तालुक्यातील जळकेवाडी, राशीन, येसवडी, धालवडी, बारडगाव दगडी, तळवडी अशा एकूण 6 गावांचा भूसंपादन मोबदला मंजूर झाला असून उर्वरीत गावांनाही हा मोबदला मिळण्यासाठी आमदार पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे. मंजूर झालेल्या 6 गावांना सुमारे 26 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जळकेवाडी गावातील 62 लाभार्थीना 6 कोटी 85 लाखांचा मोबदला प्रातिनिधिक स्वरूपात वाटपाचे पत्र व धनादेश देऊन वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून जसजशी खरेदी होईल तशी ही खरेदी झालेल्या भूखंडाची रक्कम कोळवडी भूसंपादन विभागाकडे जमा होत आहे.त्यानुसार हे वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता धुमाळ, कार्यकारी अभियंता जगताप व स्थानिक पदाधिकारी व उर्वरित भू संपादनाच्या 53 गावांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सकाळी 10 वाजता जळकेवाडी येथे भू संपादन मोबदल्याचे वाटप करण्यात येणार आहे.
कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भू संपादनाच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करत संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी कायम समन्वय साधत होते.अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या संपादित झालेल्या जमिनींचा टप्प्याटप्प्याने मोबदला मिळणार असून कुकडीच्या पाणी वाटपासंदर्भातही आमदार पवार यांनी वेळोवेळी लक्ष घातले आहे. शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळावे, भु-संपादनाचा मोबदला मिळावा यासाठी कायम प्रयत्न केले आहेत.

कुकडीच्या पाण्याबाबत नियोजन बैठक
भू संपादन मोबदला वाटपानंतर आमदार रोहित पवार यांच्या वतीने कोळवडी येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुकडीच्या पाण्यासंदर्भात नियोजन बैठक होणार आहे. त्यानंतर सीना धरणावरील 21 गावांच्या पाणी नियोजनाबाबतची बैठक सीना धरणाच्या विश्रामगृहात सायंकाळी 6 वाजता आमदार पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार असून ते ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...