Thursday, January 29, 2026
Homeनगरकुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे पूर्ण करा! - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे पूर्ण करा! – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण आणि विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल विधान भवन येथे शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी वरील निर्देश दिले.

- Advertisement -

शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित असून ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांची गती संथ असल्याचे नमूद करून आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत, असे फडणवीस यांनी सांगितले. शिर्डी विमानतळ हे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमानांच्या पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

YouTube video player

या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...