Friday, May 16, 2025
HomeUncategorizedतुम्हाला माहिती आहे का? 'स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

पौराणिक काळात ताऱ्यांना (Star) अनेक नावे दिली गेली. पण वर्तमानात असा बहुमान मिळविणारी व्यक्ती वि. वा. शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज (kusumagraj). आज त्यांचा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

- Advertisement -

कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक (nasik) येथे झाला. कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर हे आपण सगळेच जाणतो. पण कुसुमाग्रजांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर (Gajanan Rangnath Shirwadkar). त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव हे बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले.

कुसुमाग्रजांना सहा भावंड आणि कुसुम नावाची एक लहान बहिण होती जी सगळ्यांची लाडकी होती. कुसुम हि एकुलती एक बहिण असल्याने कुसुमचे अग्रज (थोरले भाऊ) म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून ते कुसुमाग्रज या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.

नाशिकमधून त्यांनी बी.ए.ची (BA) पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये भूमिका केली. चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. सत्याग्रहातही यांनी भाग घेतला. त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली.

तत्पश्चात ते मुंबईला (Mumbai) आले त्यांना तिथे मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव यांची भेट घेतली. त्यांनी ह्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. कवी असलेले कुसुमाग्रज यशस्वी नाटककार झाले. त्यांनी आपल्या लेखणी मधून सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कठोर टीका केली.

त्यांचे साहित्यिक विचार लौकिकतावादी आहे. ते आत्मनिष्ठ व समाज निष्ठा जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. कविता, नाटक, कादंबऱ्या, कथा, लघु निबंध इत्यादी प्रकाराचे साहित्य त्यांनी हाताळले.

वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले. वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील (Sweden) इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री (International Star Registry) मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (star in the gateway of heaven) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : खा. लंकेंनी अधिकार्‍याच्या लगावली कानशिलात

0
श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda आढळगाव ते जामखेड टप्प्याच्या अपूर्ण कामाबाबत सुरू असलेल्या उपोषणात खा. निलेश लंके यांनी संतप्त होवून थेट राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्‍यांच्या कानाखाली ठेवून दिली....