Friday, April 25, 2025
HomeमनोरंजनOscar 2025 Nomination : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करसाठी नॉमिनेट

Oscar 2025 Nomination : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट

मुंबई | Mumbai

अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव यांचे दिग्दर्शन असलेला ‘लापता लेडीज’ हा बॉलिवूड चित्रपट ऑस्कर २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

- Advertisement -

नुकतीच या संदर्भात घोषणा करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने २९ चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ची निवड केली आहे. हा चित्रपट भारताने बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला आहे.

आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात रवी किशन आणि छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

पितृसत्ताक पद्धतीवर हलक्या-फुलक्या पद्धतीने टिप्पणी करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट २९ चित्रपटांच्या यादीतून ऑस्करसाठी निवडण्यात आला.

या यादीत बॉलिवूडचा ‘ॲनिमल’, राष्ट्रीय पुरस्कार विजता मल्याळम चित्रपट ‘आट्टम’ आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेला ‘ऑल वुई इमॅजिन इज लाइट’ या चित्रपटांचा समावेश होता.

आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यांच्या निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटाने तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे. २९ चित्रपटांच्या यादीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘अनुच्छेद ३७०’ यांचाही समावेश होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...