Saturday, March 15, 2025
Homeनाशिककॅन्टोन्मेंट रूग्णालयात सुविधांचा अभाव

कॅन्टोन्मेंट रूग्णालयात सुविधांचा अभाव

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ( Cantonment Hospital ) देवळाली कॅम्प, भगूरसह परिसरातील 28 गावांतील नागरिक उपचारासाठी येत असल्याने गोरगरिबांचे हॉस्पिटल म्हणून याची ओळख आहे.

- Advertisement -

मात्र सध्या या हॉस्पिटलमध्ये विविध उपचारासाठी वेगवेगळे दरपत्रके जाहीर करून सर्वसामान्य जनतेने येथे उपचारासाठी यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aaghadi ) देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

बोर्डाचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहूल गजभिये यांची वंचितच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सुविधांबाबत चर्चा केली. करोना काळात या हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा जनतेला मिळाली. मात्र येथील ओपीडी सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांना इतर आजारासाठी खाजगी दवाखान्यात धावपळ करावी लागली. त्यातच सध्या हॉस्पिटल परिसरात प्रशासनाने सुविधा व त्यांचा लागणारा चार्ज याबाबतचा बोर्ड लावल्याने नागरिकांमध्ये चलबिचल सुरू आहे.

शिवाय ओपीडी सुविधाही तात्काळ चालू करणे गरजेचे आहे. शहरात सध्या साथीचे रोग फैलावत असल्याने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून या रोगांवर मात करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने उपाय योजना सुरू करण्याची मागणी डांगळे यांच्यासह रामा निकम, नाना पगारे, विवेक पवार, शाम पवार, अजय वाहने आदींनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “बीडची घटना, जयंत पाटलांची नाराजी ते झटका मटण”; शरद...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) पक्ष सोडून अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली...