Friday, November 22, 2024
Homeनगरजिल्ह्यात सहा लाख लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर

जिल्ह्यात सहा लाख लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारची महत्वाकांक्षी ठरलेल्या बहिण माझी लाडकी योजनेत आतापर्यंत 7 लाख 8 हजार महिलांचे अर्ज ऑनलाईन नारीशक्ती दूत अ‍ॅपवर नोंदवले गेले आहेत. या दाखल अर्जापैकी पडताळणीत एकट्या नगर जिल्ह्यात 6 लाख 600 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. दरम्यान, अजून एक लाखांच्या जवळपास ऑफलाईन अर्ज नारीशक्ती दूत अ‍ॅपमध्ये नोंदणी होणे बाकी आहेत. ते आज किंवा उद्या नोंदवण्यात येणार आहेत. दरम्यान, आज (मंगळवारी) अ‍ॅपवर नोंदणी झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

गेल्या 15 दिवसांपासून नगरसह राज्यभर बहिण माझी लाडकी योजनेची चर्चा आहे. ग्रामीण भागापासून ते जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत महसूल, जिल्हा परिषद यासह महानगरपालिका, नगररिषद, नगरपालिका विभागाची यंत्रणा लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल करून घेत ऑनलाईन अर्जाची पडताळणी करण्यात व्यस्त दिसत आहेत. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असताना नगर मुख्यालयासह तालुका पातळीवर तयार करण्यात आलेल्या वॉर रुममध्ये तीन शिफ्टमध्ये 30 ते 50 कर्मचारी यांनी रात्रंदिन करून ऑनलाईन अ‍ॅपवर दाखल 7 लाख 8 हजार महिलांच्या अर्जापैकी सोमवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत 6 लाख 600 अर्जांची पडताळणी पूर्ण केलेली आहे. तसेच हे सर्व अर्ज योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ही योजना प्रभावरी राबवण्यासाठी दाखल अर्जाची तातडीने पडताळणी करण्यासाठी तालुका पातळीवर वॉर रुम सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

असेच सात दिवसात हे काम पूर्ण करण्याचा निश्चिय केला होता. मात्र, अवघा सहा दिवसात सहा लाख अर्जाची पडताळणी झालेली असून उर्वरित शिल्लक अर्जाची आज (मंगळवार) सकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. दरम्यान, पडताळणी अर्जात 41 हजार महिलांचे अर्ज तात्पूर्ते अपात्र करण्यात आले असून त्यांनी पुन्हा परिपूर्ण अर्ज दाखल केल्यास त्यांचे अर्ज मंजूर होणार आहेत. यामुळे अपूर्ण माहिती आणि कागदपत्रे असणारे अर्ज महिलांनी पुन्हा दाखल करावेत, असे आवाहन योजनेचे नोडल अधिकारी मनोज ससे यांनी केले आहे.

पडताळणी होऊन मंजूर अर्ज नगर, संगमनेरची आघाडी
अकोले 43 हजार 706, संगमनेर 65 हजार 344, कोपरगाव 31 हजार 298, श्रीरामपूर 40 हजार 577, नेवासा 41 हजार 481, शेवगाव 34 हजार 608, पाथर्डी 28 हजार 245, जामखेड 26 हजार 199, कर्जत 35 हजार 801, श्रीगोंदा 41 हजार 480, पारनेर 43 हजार 694, राहुरी 43 हजार 95, राहाता 47 हजार 476, नगर 77 हजार 596 असे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या