Saturday, September 5, 2026
HomeनगरAhilyanagar : लाडकी बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग

Ahilyanagar : लाडकी बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याहीक्षणी जमा होऊ शकतो. कारण, या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास भागाने शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. 30 जुलै (बुधवारी) शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येत असतात.

दरम्यान, माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...