Sunday, October 18, 2026
HomeनगरAhilyanagar : लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा

Ahilyanagar : लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच मिळणार आहे. कारण यासाठी 319.53 कोटी रूपये निधी वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

या संदर्भातील अंतिम निर्णयाबाबत प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू असून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी वितरण करण्याचे नियोजन केले जात आहे. योजनेच्या नियमित नियमानुसार दरमहा ठरविक कालावधीत निधी वर्ग केला जातो. त्यानुसार जुलै महिन्याचा थकीत हप्ता महिलांच्या खात्यात पाठवण्यासाठी आर्थिक व तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून हा हप्ता 15 ऑगस्ट अथवा रक्षाबंधनपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...