Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana: 'लाडकी बहीण बहीण' योजनेसंदर्भात मोठी अपडेट; रक्षाबंधनाला ३००० विसराच...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण बहीण’ योजनेसंदर्भात मोठी अपडेट; रक्षाबंधनाला ३००० विसराच पण ‘या’ महिलांना १५०० रुपयेही मिळणार नाही, कारण काय?

मुंबई | Mumbai
राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा खुलासा झाला असून, तब्बल २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. १४,२९८ पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आले आहेच, शिवाय आता २६.३४ महिलाही योजनेत अपात्र ठरणार आहेत. खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.”

- Advertisement -

‘या’ लाभार्थ्यांचा हफ्ता थांबवण्यात आला
महिला व बालविकास विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली होती. या माहितीचे विश्लेषण केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य योजनेसाठी पात्र ठरले होते, तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी अर्ज करून लाभ मिळवल्याचे निदर्शनास आले. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, अशा अपात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे २६.३४ लाख असल्याचे निश्चित झाले. या माहितीच्या आधारे, जून २०२५ पासून या लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, या कारवाईमुळे पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तटकरे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सुमारे २.२५ कोटी पात्र बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाभ स्थगित करण्यात आलेल्या २६.३४ लाख अर्जांची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल शहानिशा केली जाईल. या चौकशीत जे लाभार्थी पात्र ठरतील, त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कोणती कारवाई करायची, याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून यासंदर्भात कठोर निर्णय घेतला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान २६.३४ लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले असले तरी पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...