मुंबई
मी जे काम केले, त्याची आठवण लोकांनी ठेवली, हे माझ भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा ‘लाडका भाऊ’ हे मोठ पद मला मिळाल आणि म्हणून सांगतो कुणी कितीही अफवा पसरवल्या, कुणी कितीही खोट सांगितल तरी सुद्धा ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी केले.
हिंदूहृद्य सम्राट बाळासाहेठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच्या दावणीला सत्ते साठी कोणाला बांधलं, सत्तेसाठी लाचारी पत्करली, बाळासाहेबांच्या विचाराचा विश्वास घात केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता घणाघात केला आहे. 2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हिंदूहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केले आधी सांगावे, तुमच्या नाकर्तेपणामुळं मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला .मराठी माणसाचा,हिंदुत्वाचा विश्वास घात केला महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय नेणार पुढे बाळासाहेबांचा विचार असे ही एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
मी काम करणारा माणूस आहे, आरोपाला आणि टीकेला काम करून उत्तर देणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.





