Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; लाखोंचे बनावट दुग्धजन्य पदार्थ जप्त

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; लाखोंचे बनावट दुग्धजन्य पदार्थ जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांतून अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत 12 लाखांचे बनावट पनीर व भेसळकारी पदार्थ जप्त करण्यात आले…

अन्न व भीषध प्रशासन विभागाने सणावाराच्या दृष्टीने मोहिम सुरु केलेली असून त्याचाच भाग म्हणून दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक, रिपॅक व घाऊक विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत नाशिक जिल्ह्याभरात कारवाया करण्यात येत आहेत.

बुधवारी (दि.24) अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, बी अ. रासकर, एस. के. पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मधुर डेअरी अ‍ॅण्ड डेलीनिडस् अंबड या आस्थापनेवर धाड टाकण्यात आली.

आस्थापनेत अप्पासाहेब हरी घुले (39 वर्षे) नामक इसम नमूद आस्थापनेचा विक्रेता म्हणून हजर होता. आस्थापनेता अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाच्या विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. सदरचे पनीर हे रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करुन बनावटरित्या तयार करत असताना आढळून आले.

नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी ‘संक्रांत’; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

कारखान्यात तयार झालेले पनीर तूप हे अन्न सुरक्षा व मान 2006 मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नाहीत. यावरून विक्रेता घुलेे यांनी अन्न सुरक्षा व मानके 2006 अंतर्गत वैध परवाना त्यांच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेले नसल्यामुळे त्यांच्याकडील पनीर, अँसिटीक अ‍ॅसीड, रिफाइड पामोलीन तेल आणि तूप यांचा एकूण 2 लाख 35 हजार 796 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नाशकात ‘मोठा मासा’ एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

गुरुवारी (दि. २५) अन्न सुरक्षा अधिकारी डीडी ताबोळी, गुप्तवार्ता विभागाचे अ. र. दाभाडे, गो वि कासार यांच्या पथकाने आनंद डेअरी फार्म, म्हसरुळ या आस्थापनेवर धाड टाकली. आस्थापनेत आनंद वर्मा (50) या व्यक्तीस विचारपुस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादीत केलेले असल्याचे सांगितले.

त्याठिकाणी रिफाईड पाम तेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीरचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांचे नमुने घेवुन त्यांचा एकूण 9 लाख 67 हजार 315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारखाने सिल करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या