Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्रLalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागच्या राजाचं विसर्जन, साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागच्या राजाचं विसर्जन, साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

मुंबई | Mumbai

लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) गिरगाव चौपाटीवर भाविकांनी अखेरचा निरोप दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

- Advertisement -

लालबागच्या राज्याचे तराफावरुन खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक २४ तास चालली. लालबागचा राजा हळूहळू पाण्याखाली जाताना भाविक डोळे भरुन त्याचे रुप डोळ्यात साठवत होते.

काल (१७ सप्टेंबर) सकाळी साधारण ११ वाजल्यापासून सुरु झालेली गणेशविसर्जन मिरवणूक (Lalbaugcha Raja Visarjan) आज सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास संपली.

तब्बल २४ तासांपासून चाललेली ही मिरवणूक लालबाग (Lalbaug), भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा विविध मार्गांवरुन निघाली. ज्याची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...