Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकमोदींच्या सभेपूर्वी लासलगावला कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांची निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी

मोदींच्या सभेपूर्वी लासलगावला कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांची निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी

जयदत्त होळकरांसह १० ते १२ जण ताब्यात

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (Pimpalgaon) येथे सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच लासलगाव येथे कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यातबंदी मागे घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या लोकांसह १४ ते १५ जणांना लासलगाव पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. या सर्वांना पोलिसांनी लासलगाव पोलिस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई सुरु आहे.

- Advertisement -

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, शिवा सुराशे, डॉ. विकास चांदर , विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील ,भरत होळकर, राहुल शेजवळ,मयूर बोरा यांच्यासह दहा आणखी काही जणांना लासलगाव पोलीस ठाण्याचे ( Lasalgaon Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ,पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेपर्यंत या लोकांना पोलीस ठाण्यातच अडकवून ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लासलगाव पोलीसानी मतदानावर (Voting) बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या