Tuesday, July 2, 2024
HomeनाशिकNashik Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करत दोन तरुणांकडून पोलिसांनी केले गावठी...

Nashik Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करत दोन तरुणांकडून पोलिसांनी केले गावठी कट्टे हस्तगत

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

- Advertisement -

गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील २ तरुणाना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून तीन गावठी कट्टा, नऊ जिवंत काडतूस आणि शाईन मोटार सायकल असा एक लाख आडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली.

हे देखील वाचा : Nashik Road Crime News : मागील भांडणाच्या कुरापतीतून मित्रांच्या दोन गटात गोळीबार

सिनेस्टाईल पाठलाग करत विंचूर तीन पाटी येथून दोन २२ वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आज रविवारी (दि.२३) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (Court) त्यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत (Police Custody) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

हे देखील वाचा : शेतकऱ्यासह नाेकरदार शेअरचे बळी; चाैघांना आमिष दाखवून टेलिग्रामवरुन ‘इतक्या’ लाख रुपयांचा गंडा

याबाबत मिळालेली माहिती अशी की ,रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटार सायकलने पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ, चंदू मांजरे यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिफुली येथे पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणकर, संदीप निचळ, संदीप डगळे, अविनाश सांगळे यांनी पकडले. यात अनिकेत कैलास मळेकर रा धायरी,पुणे (वय २२)आणि नामदेव रामभाऊ ठेबे (वय २२) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांकडे ३ देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली.

हे देखील वाचा : नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

दरम्यान, लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता, यापूर्वी त्याने शस्त्रे विकली आहेत काय? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उप-अधीक्षक डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिकचा तपास करत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या