Monday, June 9, 2025
Homeदेश विदेशलष्कर ए तोयबाच्या टॉपच्या कमांडरचा खात्मा

लष्कर ए तोयबाच्या टॉपच्या कमांडरचा खात्मा

श्रीनगर | Srinagar

- Advertisement -

जम्मू-कश्मीरातील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर सज्जद उर्फ हैदर याचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत हैदर सोबत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. सकाळी याच चकमकीत एका अधिकार्‍यासह तीन जवान शहीद झाले होते. जम्मू कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली. Kashmir firing

सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेइरी भागात सीआरपीएफच्या नाका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एक विशेष पोलीस अधिकारी आणि दोन सीआरपीएफ जवान असे तीन जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर ते विशिष्ट भागात लपल्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसर जवानांनी घेरला व त्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या