Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशअनंतनागमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; लश्करचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा

अनंतनागमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; लश्करचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा

दिल्ली | Delhi

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी उजैर खान याला ठार केलं आहे. एडीजीपी काश्मीर विजय कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, आम्हाला गदुल कोकरनागमध्ये दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. आम्हाला नुकताच उझैरचा मृतदेह सापडला आहे. आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह दिसला आहे. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

याआधी सोमवारी सुरक्षा दलांनी जंगलातून दोन मृतदेह बाहेर काढले होते. यातील एकाचे नाव जवान प्रदीप सिंग असे आहे. अनंतनागमधील चकमकीच्या पहिल्या दिवसापासून 13 सप्टेंबरपासून प्रदीप बेपत्ता होता. या दिवशी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनचक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले.गेल्या आठवडाभरात काश्मीरमध्ये तीन ठिकाणी चकमकी झाल्या. यामध्ये 5 जवान शहीद झाले आहेत, तर अनंतनागमध्ये 1 दहशतवादी, बारामुल्लामध्ये 3 आणि राजौरीमध्ये 2 म्हणजेच एकूण 6 दहशतवादी मारले गेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या