Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि.प. मुख्यालयात दुसऱ्या दिवशीही लेट लतीफ

जि.प. मुख्यालयात दुसऱ्या दिवशीही लेट लतीफ

नाशिक। Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेत बुधवारी लेटलतीफांबाबत झाडाझडती घेण्यात आल्यानंतरहीगुरुवारी (दि.२१) पाच सेवक कार्यालयीन वेळेत उपस्थित न झाल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी नाशिक पंचायत समितीमध्ये आज सरप्राईज भेट दिली.

- Advertisement -

यामध्ये ३८ सेवक कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने या सेवकांना नोटीसा देण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयांमध्ये सेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सेवकांच्या हजेरीपत्रकांची तपासणी सुरु केली आहे.

बुधवारी (दि. २०) कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या १४३ सेवकांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांगलीच झाडाझडती घेत यापूढे उशिराने आल्यास कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले होते.

गुरुवारी प्राथमिक शिक्षण विभागातील चार तर बांधकाम क्रमांक दोन मधील एक सेवक कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सेवकांना नोटीसा द्या नाशिक पंचायत समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड यांनी पावणेदहा वाजता सुरु केलेल्या तपासणीमध्ये सामान्य प्रशासन विभागातील १२, शिक्षण विभागातील ५, लघु पाटबंधारे विभागातील ५, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३, व बालकल्याण विभागातील ५, पशुसंवर्धन विभागातील २, आरोग्य विभागातील २ तर ४ कंत्राटी कर्मचारी असे एकुण ३८ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले.

सदर सेवकांना नोटीसा बजावण्याचे निर्देश गटविकास अधिका-यांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या