Monday, November 25, 2024
Homeदेश विदेश२२ मार्चला देशात जनता कर्फ्यू- नरेंद्र मोदी

२२ मार्चला देशात जनता कर्फ्यू- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना कोरोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. देशाभरात १७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात  ४४ रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत आहेत.

जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मी आज १३० कोटी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप कोरोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक कोरोनाचं संकट गहिरं झालं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

कर्फ्यु दरम्यान नागरिकांनी घरातून बाहेर पडणं टाळा. ऑफिसची कामं घरातूनच करण्याचा प्रयत्न करा, तसेच आपल्या आजुबाजुला असणार्‍या वरिष्ठ नागरिकांनी येणारे काही आठवडे घराबाहेर पडू नये व नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावे व सहकार्य करावे असे मोदी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या