Tuesday, December 10, 2024
Homeनगरशहर पोलीसांचा वेश्याव्यवसायावर छापा

शहर पोलीसांचा वेश्याव्यवसायावर छापा

परप्रांतीय मुलीची सुटका; एकजण ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील गुलमोहर रोडवर एका अपार्टमेंटमध्ये चालत असलेल्या वेश्याव्यवसायावर शहर पोलिसांनी छापा टाकून एका परप्रांतीय मुलीची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणार्‍या एकाला ताब्यात घेतले आहे. अमर उर्फ विकी गोपालदास सोळुखे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

शहरातील गुलमोहर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस हवालदार निपसे, पोलीस नाईक मिरपगार, फसले, पोलीस हवालदार लहारे, खरात, महिला पोलीस हवालदार गायकवाड, भगत, सुद्रीक यांनी मिळून गुरूवारी (दि. 2) रात्री आठच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये छापा टाकला.

यावेळी एका परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली. तर अमर सोळुखे याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात वेश्यव्यवसाय चालविणार्‍या सोळुखेविरूद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या