श्रीरामपूर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए व एनपीआर कायद्याविरोधात शहरात काल सकाळी संविधान बचाव समितीतर्फे महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय व सर्वधर्मिय नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सदर मोर्चामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणिय होता.
सकाळी 11.30 वाजता येथील हनुमान मंदिराशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला संविधान बचाव समितीच्या पदाधिकार्यांनी पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ केला. सदर मोर्चा मेन रोड, शिवाजीरोड, सय्यदबाबा चौक, कॉलेज रोड मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी त्याचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी आ. लहू कानडे म्हणाले की, सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे भाजपाचेच अपत्य आहे. येथे स्वाभिमानाने जगणार्या समाजाला ते पुरावे मागत आहेत. हे आंदोलन तरुणांनी हातामध्ये घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, इंद्रनाथ थोरात, लकी सेठी, मुजफ्फर शेख, दिपाली ससाणे, हेमंत ओगले, उबेद शेख, कॉ. जीवन सुरूडे, मौलाना इर्शादुल्लाह, मौलाना इमदाद अली, मुफ्ती अतहर हसन, मल्लू शिंदे, अॅड. समीर बागवान, धनंजय कानगुडे, अरुण पाटील नाईक, संतोष मोकळ, पांडुरंग शिंदे, रियाज पठाण, मुख्तार शाह, सुनील मगर, साजिद मिर्झा, एजाज बारुदवाले, फिरोज पठाण, नईम शेख, रियाज पोपटीया, शाहीद कुरेशी, रिजवान शेख, अकबर पठाण, नदिम तांबोळी, जावेद तांबोळी, सोहल बारुदवाले, जावेदभाई पठाण, शाकीर शेख, महेबूब कुरेशी, तिलक डुंगरवाल, महेंद्र त्रिभुवन, डॉ. सलीम शेख, बाळासाहेब बागुल, रामदास धनवडे, नाजिम शेख, जोएफ जमादार, अशोक बागुल, नागेश सावंत, अमरप्रीत सिंग, तौफिक शेख, अहमद जहागिरदार, श्री. दिवे, दीपक कुर्हाडे, सुरेंद्र सावंत, श्री. चौदंते, नईम शेख, हाजी पापा, शाहीद कुरेशी, फिरोज पठाण, जावेद तांबोळी, सलीम जहागिरदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून देशातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. परंतु या कायद्यामुळे देशातील जनता अडचणीत सापडणार असल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. मोर्चामुळे सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौक, गोंधवणी रोड आणि वॉर्ड नंबर 2 मध्ये दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला.
मोर्चाच्या शेवटी संविधान बचाव समितीच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना देण्यात आले. सर्वपक्षीय नेतेमंडळींचा देखील यात सहभाग होता. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल संविधान समितीच्यावतीने आंदोलकांना धन्यवाद देण्यात आले. अहमद जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक बागुल यांनी आभार मानले. निवेदनाचे वाचन मुजफ्फर शेख यांनी केले.
सदर मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरामध्ये चौका-चौकांत पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.